पुण्यातील तबला वादक श्री.प्रशांत फाटक, श्री. मोहन पारसनीस ,श्री.विजय दास्ताने व श्री.संजय करंदीकर यांनी आवर्तन या संगीतिवषयक संस्थेची स्थापना गुरुवार दि . १३ जानेवारी २०११ रोजी केली आहे.
भूमिका व उद्देश :- Aavartan - A Continuous Musical Movement.
तबलावादक हा शास्त्रीय, सुगम व लोक संगीत अशा विविध विषयांशी (गायन, वादन, नृत्य इ. ) निगडीतअसतो. त्यामुळेच,
- शास्त्रीय, सुगम व लोक संगीत क्षेत्रातील मान्यवर कलाकारांचे कार्यक्रम सादर करणे
- आपल्या गुरूंच्या मागर्दशर्नाखाली शिस्तबद्ध तालीम घेत असलेल्या आश्वासक विद्यार्थ्यांना त्यांची कलासादर करण्याची संधी देणे / त्यांच्यासाठी स्पर्धा आयोजित करणे
- उदयोन्मुख कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे
- संगीत व्यावसायिकांची सूची, कलाकार कल्याण निधी उभारणे, कलाकारांच्या विम्याची व्यवस्था, व्यावसायिकअडचणींवर मार्गदर्शन व एकूण प्रगती संदर्भात, संगीत परिवाराचे संघटन करणे
अर्थात वरील सर्व उपक्रम यशस्वी होण्यासाठी संगीत क्षेत्रातील मान्यवरांपासून, संगीताचे विद्यार्थी व रसिकांपर्यंत सर्वांची तन, मन, धनाने मदत व उस्फुर्त सहभाग अपेक्षित आहे.
तरी यासंदर्भात श्री.प्रशांत फाटक (९८९०९६००५३), श्री. मोहन पारसनीस (९८२२६३९२८४), श्री.विजय दास्ताने (९४२३००१२००), श्री.संजय करंदीकर (९७६६३१९१४६) किंवा स्वर-ताल साधना, १२२३, सदाशिव पेठ, पुणे ३०, पेरुगेटाजवळ (फोन:(०२०)२४४८५७१५, email: swartaalsadhana@yahoo.com) येथे संपर्क साधावा, ही विनंती.